इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी : - मोहरम सणा निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी लोहारा शहरातील शिवाजी चौकात मिलाप मित्र मंडळाच्यावतीने दि. 21 सप्टेंबर रोजी शरबत वाटप करण्यात आले.या शरबाताचा आस्वाद हिंदु,मुस्लीम बांधवानी घेतला.
यावेळी मुस्लीम समाजाचे धर्मगुरु तथा नगर पंचायतचे अर्थ व बांधकाम सभापती आबुलसाहेब कादरी,नायब तहसीलदार पंकज मंदाडे,पो.नि.सर्जेराव भंडारे,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी अप्पा कदम,नरदेव कदम,समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील,तलाठी जगदिश लांडगे,सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,शिवा स्वामी,पं.स.चे
माजी सदस्य सुधीर घोडके,अंकुश नारायणकर, मिलाफ मित्र मंडळाचे अध्यक्ष रहेमान(दादा) मुल्ला, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,मोहन गोरे,प्राचार्य शहाजी जाधव,आदम मुल्ला,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तथा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,अंकुश नारायणकर,अजिम सिद्दीकी, नगरसेवक आरीफ खाणापुरे,जब्बार मुल्ला,जलाल मुल्ला,यांच्यासह हिंदु,मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.