- स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन
मुर्तिजापू :- २०%अनुदानास पात्र शाळांना प्रचलीत नियमानुसार वेतन अनुदान अदा करा या एकमेव मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 2४ सप्टेंबर २०१८ पासून शिक्षक आमदार मा.नागोजी गाणार मा.कपिलजी पाटील,मा.दत्तात्रयजी सावंत,मा.श्रीकांतजी देशपांडे,मा.बाळारामजी पाटील,मा.विक्रमजी काळे,मा.किशोरजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शिक्षक संघटना बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री के.पी.पाटील, राज्य कार्यवाह श्री उमेश पाटील साखरे प्रदेशाध्यक्ष श्री बाळकृष्ण गावंडे व प्रदेशमहासचिव ज्ञानेश पाटील चव्हाण यांनी दिली आहे.
राज्यात शासनाने 2001 साली कायम विनाअनुदानित तत्त्वावर 2000 प्राथमिक व 2000 माध्यमिक शाळांना परवानगी दिली त्यांनतर 2009 नंतर सर्व कायम विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन करून ज्या शाळा अनुदानास पात्र ठरतील अशा शाळांना पहिल्या वर्षी 20%दुसऱ्या वर्षी 40%तिसऱ्या वर्षी 60%चौथ्या वर्षी 80%व पाचव्या वर्षी 100%अनुदान देण्याचे आदेश आहे परंतु या शासनाने अनुदान सूत्रात बदल करून सर्व 100%अनुदान पात्र शाळांना 19सप्टेंबर 2016 रोजी सरसकट 20%अनुदान देऊन बोळवण केली.
खरं बघता आज 20%अनुदान सुरु होऊन दोन वर्षे होऊन गेली व 1व 2 जुलै 2016 रोजी अनुदानास पात्र झालेल्या शाळांना हि अजून प्रत्येक्षात अनुदान सुरु झाले नाही व अघोषित शाळाही अजून निधीसह घोषित केल्या नाही.शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे विनाअनुदानित शिक्षकांवर वेठबिगारी व उपासमारीची वेळ आली आहे या विरोधात स्वाभिमानी शिक्षक संघटनेने अगोदर 24 दिवस मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले त्यावेळी राज्याचे राज्यपाल,शिक्षण मंत्री,वित्त मंत्री व वित्त सचिव यांनी जून पासून सर्व 20%अनुदान पात्र शाळांना प्रचलित वेतनश्रेणी नुसार वेतन दिल्या जाईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही त्यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही म्हणून येत्या 25सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानात सर्व 20%पात्र घोषित शाळांना प्रचलित नियमानुसार 100%अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.तरी सर्व महाराष्ट राज्यातील शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण गावंडे,आस्सीमोद्दीन सर,जिल्हाध्यक्ष निलेशजी खेंडकर,संदीपजी येऊल,अंकुशजी शेंडोकार,पंकजजी चव्हाण, रामचंद्र उबाळे यांनी केले आहे.
"सतरा वर्ष शासनाचा एक रुपयाहि न घेता विनावेतन आमच्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले व आमचे विध्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर नेले असे असूनही आमच्यावर वेठबिगारी व उपासमारीची वेळ येतेय याकडे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे.आंदोलकाच्या जीवीतास कुठलाही धोका झाल्यास त्याला राज्य शासन सर्वस्वी जबाबदार राहील .त्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.त्यामुळे शासनाने लवकरात लवकर प्रचलीत अनुदान या शाळाना देण्याची कार्यवाही करावी
जिंकू किंवा मरू ।
Replyआरपारची लढाई सुरू ।