यवतमाळ :- भारतरत्न माजी पंतप्रधान, स्व.अटलजी बिहारी यांचे स्मरणार्थ, भारतीय जनता पार्टी व वसंतराव नाईक वै.म.विद्द्यालय अभयांगत मंडलाचया संयुक्त विद्दमाने, येथील उमरसरा प्रेरणा नगर,प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित, भव्य आरोग्य तपासणी शिबिराला आज नागरिकांनी आपले आरोग्य तपाणी करून उत्सफूर्त प्रतिसाद दिला.शिबिरात पालकमंत्री ना. मदनभाऊ येरावार यांनी मनोगत व्यक्त करताना, शिबिर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
शिबिराला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी भेट देऊन पाहणी केली. वैद्दकीय महाविद्यालय व न.प.चया डॉक्टर पथकाने शेकडो रूग्णांची तपाणी करून मोफत औषध वाटप केले. न.प.सभापती व अभयंगत मंडलाचे सदस्य दिनेश चिंडाले ,डाँ.फरहत खान यांचे पुढाकाराने शिबिर यशस्वी झाले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, युवा मोर्चा, उत्तर भारतीय मोर्चा, महिला शाखांसह अभयांगत मंडलाचया कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात सभापती दिनेश चिंडाले,नगरसेविका रिता धावतोडे, डाँ.फरहत खान, अमोल ढोणे,माया शेरे,भारती जाठे,रघुवीरसिंह चौहान, सुऱज विश्वकर्मा,जयंत झाडे,इत्यादीं उपस्थित होते.