जिल्हा प्रतिनिधि,मक़सूद अली
यवतमाळ :- पांढरकवडा रोड स्थित रॉयल फंक्शन हॉल मध्ये सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी टीम सेवा ने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी स्पर्धा परिक्षा बाबत मार्गदर्शन करण्याकरीता पुणे येथील सीएसआयआर चे माजी शास्त्रज्ञ डा.इम्तीयाज मुल्ला, चिफ इंकम टॅक्स कमीशनर अक्रम खान तथा पुणे चे युनीक अॅकेडमी चे सेंट्रल हेड जव्वाद काजी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थींचा उत्साह वाढविण्याकरीता तसेच स्पर्धा परिक्षे संबधी योग्य मार्गदर्शन मिळावे याकरीता जालना येथील आयएएस अन्सार शेख यांची व्हीडीओ कॉन्फेरंस सुध्दा आयोजित केली होती. यावेळी जिल्हाभरातून शेकडो पालक आपल्या पाल्यांसह उपस्थित होते.
या समारोहमध्ये अमरावती येथील आयी शबनम सय्यद हीला सम्मानित करण्यात आले, हिने जर्नालिजम व मास कम्युनिकेशन ची डीग्री मध्ये प्रथम येवून विद्यापिठातून सुवर्ण पदक प्राप्त केले. सोबतच यवतमाळ शहरातील सन 2018 मध्ये उमैद काजी यांनी एमबीबीएस ची शिक्षा पुर्ण केली यांनाही सम्मानित करण्यात आले. 2018 मध्ये डाक्टर शयमा सय्यद ने यांनी पण बीडीएस चे शिक्षण पुर्ण केले. त्यांनाही सम्मानित करण्यात आले.