इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील नागराळ व बेंडकाळ या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि.27 सप्टेंबर रोजी घोषीत झाला.नागराळच्या सरपंचपदी रितु गोरे,तर बेंडकाळच्या सरपंचपदी सुरेखा गोरे यांनी बाजी मारली आहे.यावेळी नायब तहसीलदार पंकज मंदाडे,पेशकार बालाजी चामे,उपस्थित होते.
तालुक्यातील नागराळ,बेंडकाळ या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी दि.26 सप्टेंबर रोजी मतदान झाले.लोहारा तहसील कार्यालयात दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.नागराळ, बेंडकाळ,ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते.प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जात असल्याने दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली होती.
नागराळ ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागा आहेत.यापैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध निघाल्या आहेत.सरपंंच व एका सदस्याच्या जागेसाठी निवडणूक झाली.सरपंचपदासाठी जयश्री पाटील, इंद्रायणी गोरे,रितू गोरे,निर्मला नेताजी गोरे यांच्यात चौरंगी लढत झाली.यात रितु गोरे यांनी सर्वच प्रभागात आघाडी घेत विजयी झाल्या.त्यांना 210 मताधिक्य मिळाले तर त्यांचे प्रतिस्पपर्धी इंद्रायणी गोरे यांना 154,तर निर्मला गोरे यांना तिसऱ्या क्रमाकांची 88 मते मिळाली.प्रभाग दोन मधून शेषेराव गोरे यांनी विजय मिळविला.
बेंडकाळ ग्रामपंचायतच्या सात जागेपैकी तीन जागा बिनविरोध निघाल्या आहेत.तर प्रभाग दोनमधील इतर मागास वर्गासाठी राखवी असलेल्या जागेसाठी एकही उमेदवारी न आल्याने जागा रिक्त राहिली.त्यामुळे सपंचासह चार जागेसाठी निवडणूक झाली. सरपंचपदाच्या चौरंगी लढतीत सुरेखा गोरे यांनी 207 मताधिक्य घेऊन विजयी झाल्या.शकुंतला गोरे यांना 139 तर अनुसया गोरे यांना 138 मते मिळाली. प्रभाग एकमधून लक्ष्मण मोरे,रत्नप्रभा गोरे विजयी झाले.प्रभाग तीनमधून रंजना कांबळे विजयी झाल्या. निकाल घोषीत नागराळ व बेंडकाळ येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. यावेळी पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.