इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा पोलिस स्टेशन हद्दित गणेश उत्सव व मोहरम सण हिंदु,मुस्लीम बांधवानी एकोपा ठेवुन सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,कार्यक्रम कुठलाही गालबोट न लावता शांततेत उत्साहात साजरा केला.या काळात पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.यामुळे या पोलीस ठाणे हद्दीत कुठलाही अनुसुचित प्रकार घडला नाही.या कार्याची दखल घेवुन लोहारा विकास समितीच्यावतीने पो.नि.सर्जेरावभंडारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी लोहारा विकास समिती अध्यक्ष जालिंदर कोकणे,समितीचे मार्गदर्शक नागन्ना वकील,नगरसेवक बाळासाहेब कोरे,शब्बीर गवंडी,बालाजी मक्तेदार, गोरख नारायणकर,यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.