एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकाला 20 हजाराची लाच घेतांना पकडले


यवतमाळ(प्रतिनिधी) :  यवतमाळ एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक पदावर कार्यरत असलेले विनय तुकाराम गव्हाळे या 55 वर्षीय अधिकाऱ्याने तक्रारकर्त्याला 1 लाख रुपयाची मागणी केली होती. त्याचा पहिला  टप्पा 20 हजार रुपयाची रोख रक्कम स्विकारतांना आर्णी रोडवरील स्वत:च्या शासकीय निवासस्थानी एसीबीच्या पथकाने सापळा  रचून धाड घालून रंगेहात पकडले आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारकर्ता याची पत्नी वाहक म्हणून यवतमाळ येथे कार्यरत होती. काही कारणास्तव तीला बडतर्फ केले होते. याबाबत कामगार न्यायालय यवतमाळ येथे अपील करण्यात आली. त्यांचे पत्नीच्या बाजुने कामगार न्यायालयाने निकाल दिला. तसेच औद्योगीक न्यायालयाने सुद्धा पत्नीच्या बाजुने निर्णय दिला. आरोपी विनय तुकाराम गव्हाळे या विभाग नियंत्रकाने  दि. 26 सप्टे. 18 रोजी पडताळणी दरम्यान तक्रारकर्त्याला त्याचे पत्नीचे  डेपो संबधीत ऑर्डर काढण्यासाठी तसेच बडतर्फीच्या काळातील पगार काढण्यासाठी अशी एकुण 1 लाख रुपये लाच देण्याची मागणी केली.

 या रकमेपैकी पहिला टप्पा 20 हजार रुपये दि. 27/9/18 रोजी आर्णी रोडवरील शासकीय निवासस्थानी आज स्विकारला. त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. लाच रकमेचा दुसरा टप्पा 10 हजार रुपये पोस्टींग ऑर्डर मिळाल्यावर  आणि उर्वरीत लाच रक्कम बडतर्फ काळातील वेतनाचा चेक मिळाल्यानंतर स्विकारण्याचे या प्रथमश्रेणी अधिकाऱ्याने मान्य केले होते.

ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत भीवरे, एसीबी अमरावी, आणि श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक राजेश मोळे व पोलीस निरिक्षक अस्मिता नगराळे यांचे सहकारी कर्मचारी शेषराव सोयाम, निलेश पखाले, अनिल ठाकुर, किरण खेडकर, सुरेंद्र जगदाळे, महेश वाकोडे, वसीमशेख, सचिन भोयर, राकेश सावसाकळे,  विशाल धलवार या अँटी करप्शन ब्युरो यवतमाळचे पथकाने पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post