![]() |
रेल्वेच्या कामाचा शुभारंभ करतांना खासदार भावनाताई गवळी सोबत रेल्वेचे अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी |
वर्धा यवतमाळ नांदेड या नविन रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी कळंब तालुक्यात सुरु असलेल्या रेल्वेच्या कामाची पाहणी करतांना यवतमाळातून कळंब च्या दिशेने सुध्दा मातीकामाला सुरुवात करा अशी सुचना रेल्वेच्या अधिका-यांना दिली होती. विशेष म्हणजे हे काम गणेश उत्सवाच्या पर्वावर सुरु करु अशी ग्वाही दिली होती. आज खासदार भावनाताई गवळी यांनी यवतमाळातून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करुन आपला शब्द पाळला. दुपारी 1 वाजता खासदार भावनाताई गवळी यांनी पुजन करुन या कामाचा शुभारंभ केला. रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार असलेल्या जागेवरच हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परीषद मराठी शाळा वाघाडीच्या मागील बाजुस रेल्वे स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे.
यवतमाळातून कळंब कडे सुध्दा मातीकाम सुरु करण्यात आल्याने या कामाला वेग येणार आहे. याप्रसंगी रेल्वेचे उपमुख्यअभियंता (कन्स्ट्रक्शन) एच एल कावरे, कार्यकारी अभियंता राकेश धनगर, शाखा अभियंता अमन कुमार, आर बी आर जेव्ही ग्रुप चे आर भरत रेड्डी, शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख प्रविण पांडे, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, यवतमाळ पंचायत समितीचे उपसभापती गजानन पाटील, तालुका प्रमुख किशोर इंगळे, वसंत जाधव, गिरीष व्यास, उपतालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख नितीन बांगर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, कल्पना दरवई, संगीता डेरे, ज्योती चिखलकर, विक्की ब-हाणपुरे, दिपक सुकळकर, सचिन चव्हाण, रुपराव कुयटे, डॉ प्रसन्न रंगारी, भुषण काटकर, प्रसाद अवसरे उपस्थित होते.
पुलांची कामे सुरु
वर्धा ते कळंब या रेल्वे मार्गावर 12 मोठे पुल बांधण्याचे काम सुरु झालेले आहे. आता कळंब ते यवतमाळ मार्गावरील पुलांचे सुध्दा टेंडर काढण्यात आले आहे. या मार्गावर 25 मुख्य पुल बांधण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त 15 छोटे पुल बांधण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी रेल्वेच्या अधिका-यांनी दिली.
Very Useful Post. Thanx for it.
Reply