इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महापुरुषांचा वसा चालवणारी चळवळ म्हणजे अंनिसअसे प्रतिपादन प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी केले. परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,उस्मानाबाद व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.19 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला,तुळजापूर येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकाचेे खास 'वैज्ञानिक जाणीवा प्रशिक्षण शिबिर'आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात 'संत समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन 'या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड बोलत होते.या शिबीराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. महेश मोटे होते.या वेळी प्रमुख म्हणुन जिल्हा प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर,विस्तार अधिकारी तात्या माळी,अॅड.अजय वाघळे,कोलते अदि उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा.डॉ.महेश मोटे यांनी मअंनिसची वाटचाल,भूमिका विशद करताना म्हणाले की,आपल्या देशासमोरील सर्वात मोठे आवाहन अंधश्रद्धेचे असून त्याचा मुकाबला करण्याकरिता लोकसहभाग महत्वाचा आहे.या शिबीराचे प्रास्ताविक चंद्रकांत उळेकर व सूत्रसंचालन सहशिक्षक भैयरव कानडे यांनी केले.तर आभार राजाराम वेदपाठक यांनी मानले.या वेळी तुळजापुर त तालुक्यातील विविध प्रशालेतील माध्यमिक शिक्षक-शिक्षीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.