- ऑल इंडिया मुशायराचे 2 ऑक्टो.ला आयोजन
मक़सूद अली
यवतमाळ: येथील जावेद अन्सारी मित्र परिवाराचे वतीने येत्या मंगळवार, 2 ऑक्टोंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता ऑल इंडिया मुशायराचे आयोजन एक शाम राष्ट्रीय एकता के नाम या मथळ्याखाली करण्यात आले आहे.
पांढरकवडा रोड स्थित रॉयल पॅलेसमध्ये या मुशाराचे आयोजन केले असून यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे नेता माणिकराव ठाकरे, नसीम खान, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, मनिष पाटील, नगरसेवक जावेद अन्सारी, रवी ढोक, गाडे पाटील सह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. या मुशायरामध्ये प्रख्यात शायर मंजर भोपाली(भोपाल),
जोहर कानपुरी(कानपुर), शबीना अदीब(कानुपर उ.प्र.), डॉ.अंजुम बाराबंकवी(उत्तर प्रदेश), हाशिम फिरोजबादी(हाशिम फिरोजाबादी), खालीद नैयर(अमरावती), डॉ.झिया टाँकी(राजस्थान), डॉ. अहेमद निजामी(उज्जैन), टिपीकल जगतीयाली(तेलंगना), शबनम अली(उजैन), मस्तान काशीफ,(यवतमाळ) डॉ.अहेमद उरूज(अकोला), अशफाक शाज(यवतमाळ) सहभागी होतील. या मुशायराचा आस्वात रसिक यवतमाळकरांनी घ्यावा असे आवाहन जावेद अन्सारी मित्र परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.