इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथे संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या 22 व्या पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दि.20 सप्टेंबर रोजी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार व सह्याद्रि फाऊंडेशन्स संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके देशमुख यांनी भेट देऊन संत मारुती महाराज यांच्या पादुकांचे व हभप महेश महाराज यांचे दर्शन घेतले.
यावेळी सायंकाळची श्रीमदभागवताची आरती विशेष मानकरी तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार,डॉ.दिगज दापके देशमुख,साहेबराव पाटील श्री.डांगे,सुनील सुर्यवंशी,शरद जाधव,डॉ. रुपाली श्रीगिरे,डॉ.हेमंत श्रीगिरे,उषाबाई मारुती आकडे,ज्ञानदेव सुर्यवंशी,दिगंबर भिमराव ढोणे, दत्तात्रय जनार्धन मोरे,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,पत्रकार अशोक दुबे, राम जाधव,सुग्रीव रणखांब, काका मोरे,हणमंत पंढरपुरे,हरी लोमटे,लक्ष्मण पवार,उत्तम पाटील, यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी महायज्ञ व्यासपीठावर हभप महेश महाराज यांनी अभिमन्यु पवार व डॉ.दिग्गज दापके देशमुख यांचा सत्कार केला.यावेळी शिवाजी साठे, महादेव धारुळे,अनिल ओवंडकर,गणेश कुलकर्णी, गणेश परतापुरे यांच्यासह हजारो पंचक्रोशीतील भाविक भक्तगण उपस्थित होते.