कुरूम : पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या कुरूम येथे गणेश विसर्जनाच्या पृष्ठभूमीवर सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावरून पोलिसांनी २० सप्टेंबरला पथसंचलन केले.
यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या नेतृत्वात २५ एसआरपी कर्मचारी,२० पोलीस कर्मचारी,१५ होमगार्ड,५ महिला कर्मचारी यांच्यासह ईतवारा चौक,आठवडी बाजार रोड,गुरूदेव सेवा मंडल समोरून,देशमुख पुरा,भिमनगर त्रिमुर्ती चौक,जामा मस्जिद,कोरडे पुरा,माळी पुरा,बस स्थानक रोड या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुक मार्गाने पथसंचलन केले.