कुरूम : आठ दिवसाच्या तापाने कुरूम येथील ५० वर्षीय महिलेचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.१९ सप्टेंबरला सकाळी अंदाजे ११:३० वाजता घडली.
कुरूम शिवनगर येथील रहिवासी सौ.सुलभा शंकरराव वानखडे वय ५० वर्ष हि महिला स्थानिक पंचशील विद्यालय कुरूम येथे मदतनीस म्हणून खिचडी शिजविण्याचे काम करत असत व त्याच्यातुन मिळणाऱ्या मजुरीतून आपल्या पाच मुलीचा पालन पोषणाला हातभार लावत असत.
मृतक सुलभा वानखडे या महिलेला आठ ते दहा दिवसा अगोदर ताप आला असता कुरूम येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आला परंतु प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा न झाल्याने शुक्रवार दि.१४ सप्टेंबरला रात्री तिला अमरावती येथील इर्विन रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले व उपचार करण्यात आला परंतु तिथेही प्रकृतीत कुठल्याच प्रकारची सुधारणा न झाल्याने अखेर नातेवाईकांनी तिला पुढील उपचाराकरिता चांगल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले व तिथे उपचार करण्यात आला परंतु नियतीला ते मान्य नव्हते,उपचाराने साथ न दिल्याने अखेर सुलभा वानखडे ची बुधवारला सकाळी अंदाजे ११:३० वाजतादरम्यान प्राणज्योत मालविली.
अतिशय मनमिळावु व धार्मिक स्वभाव असलेल्या सुलभा वानखडे च्या जाण्याने वानखडे कुटूबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येते.
तिच्या मागे पती,पाच मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.