तंत्रज्ञानामुळेच भारत महासत्ता बनेल.....आमदार बसवराज पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- ज्ञान आणि विज्ञान यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती करावयाची असेल तर अशा प्रयोगशाळाची निर्मिती झाली पाहिजे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच तंत्रज्ञानात मोठी क्रांती झाली.या तंत्रज्ञानामुळेच भारत महासत्ता बनेल असे प्रतिपादन औसाचे आमदार बसवराज पाटील यांनी केले. 
                                               उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात केंद्र सरकारच्या निती आयोगाकडून मिळालेल्या अटल टिंकरींग लँबचा दि.18 सप्टेंबर रोजी उदघाटन करुन आ.बसवराज पाटील बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील होते.या वेळी प्रमुख म्हणुन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे(उमरगा),नगराध्यक्षा अनिता अंबर(मुरुम),पं.स.सभापती ज्योतीताई पत्रिके
(लोहारा),शिक्षण समिती सदस्य रफीक तांबोळी, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई तोरकडे,दिलीप भालेराव,माध्यमिक शिक्षण विस्ताराधिकारी काळे, सांगळे,गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे(उमरगा),
प्राचार्य डॉ.गरुड,डॉ.अशोक सपाटे,पं स.सदस्य  व्यंकट कोरे,उपनगराध्यक्ष संतोष चिलोबा,
उपमुख्याध्यापक धनराज पवार,उपप्राचार्य सुधीर अंबर,चंद्रमामा पाटील आदींची उपस्थिती होते.   

                 पुढे बोलताना आ.बसवराज पाटील म्हणाले कि, विज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे जग अतिशय जवळ आले आहे.अशा तंत्रयुक्त व अद्यावत प्रयोगशाळा विकसित झाल्या तर उद्याचे नवीन शास्त्रज्ञ यातून निर्माण होतील.यामुळे दर्जेदार साहित्य उदयास येवून पुढील पिढीसमोर एक आदर्श निर्माण होईल.यामुळे देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.                        या वेळी विस्ताराधिकारी शिवकुमार बिराजदार
(उमरगा),प्राचार्य दिलीप गरुड,डॉ.अशोक सपाटे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काकासाहेब पाटील,प्रविण गायकवाड,बालाजी बिदे, संतोष बिदगे,राधाकृष्ण कोंडारे,शिवशरण तांबडे आदींनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सुर्यवंशी व सुत्रसंचालन उल्हास घुरघुरे यांनी केले तर मुख्याध्यापक काशीनाथ मिरगाळे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी,विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post