- पहिल्या च पावसात लागली रस्त्याची वाट
भुषण महाजन
रावेर प्रतिनिधी :- के-हाळा सबस्टेशन ते पिप्री रस्त्याची झालेली दुर्दशा बघून शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून करोडो रूपये निधी रस्त्याच्या विकास कामा साठी उपलब्ध केला आलेल्या निधीचा वाजा गाजा करत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली मात्र नव्याचे नऊ दिवशी सपताच त्या रस्त्याचे कामा खराब झाले पहिल्या पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडून उत्कृष्ट कामाचा नित्कृष्ट नमूना जगा समोर आले या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याचा प्रत्यय पहिल्याच पावसात पहावयास मिळाला. या करोडो रूपयांच्या रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहे त्यामध्ये पाणी साचल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
हे बघण्याची गरज शासकिय अधिकारी याची आहे रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक खात्याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये 4-- 5 कि.मी रस्त्याचे काम होते गेली पाच महिन्या पूर्वी या रस्त्याचे काम झाले पुर्ण झाले आहे. या कामाचा दर्जा चांगला असल्याची प्रतिक्रिया त्या भागातील ग्रामस्थ व्यक्त करीत होते
मात्र गेली चार महिन्यापूर्वी झालेल्या या रस्त्याची कशी वाट लागली याचा नमुना सर्वान समोर आहे अधिकारी लोकप्रतिनिधी ठेकेदार अशी साखळी कामाचा कसा बट्या बोळ लावता हे उघड गुपीत आहे ठेकेदाराने आपण अकलेचे तारे तोडत,जखम माडीला अन,मलम शेडीला लावुत,आधे तेरे आधे मेरे करत आपली पोळी भाजली असल्याची खुलेआम चर्चा होत आहे सदरील कामा मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी तसेच गाव पुढाऱ्यांनी याकडे जाणुन बुजून दुर्लक्ष केले . यामध्ये संबधीत ठेकेदाराकडून कुणाला बंद पाकीट मिळाले. याचीच चर्चा होत आहे. निकृष्ट रस्त्याची पाहाणी करण्याची जबाबदारी संबधीत अधिकाऱ्यांची असुनही ते रस्ता कसा तयार झाला याची अद्याप पाहणी सुद्धा त्यांनी केलेली नाही.
पिप्री रस्ता विकासात्मक कामांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रात प्रसिद् असलेले मगरूळ धरण या हद्दीतील जगप्रसिद्ध आहे येथे जाण्यासाठी हा रस्ता सुलभ आहे.
वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. याकरीता हा रस्ता चांगल्या दर्जाचा होणे गरजेचे आहे अशी मानसीकता या भागातील जनतेची आहे. लोकप्रतिनिधीनी संबंधित ठेकेदाराला याचा जाब विचारून रस्ता चांगल्या दर्जाचा व टिकावू होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे