हत्येच्या गुन्हातील आरोपीस अखेर अटक


कुरूम : मुर्तिजापुर तालुक्यातील ग्राम मंदुरा येथिल हत्येच्या गुन्ह्यातील बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आरोपीस जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी झाल्याने माना पोलिसांनी मंगळवार दि.११ सप्टेंबरला रात्री आरोपीस अटक केली.
          पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या ग्राम मंदुरा येथे मुलीचा हात धरणाऱ्या युवकाची वडिलाने चाकूने  सपासप वार करून हत्या केल्याची घटना बुधवार ५ सप्टेंबरला रात्री घडली होती.मंदुरा येथील रहिवासी २२ वर्षीय शुभम देवानंद तेलमोरे असे मृतक युवकाचे नाव होते.या प्रकरणात पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत मोठया शिताफिने दोन तासातच आरोपीचा छडा लावून माना पोलिसांनी मुलीचे वडील रामेश्वर उर्फ रामा वासुदेव चौके विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला होता.

        घटनेच्या दिवशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते.परंतु तो घटनेपासून बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याला माना पोलिसांनी उपचाराकरिता मुर्तिजापुर  व तेथून अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते तेथे त्याच्यावर उपचार चालू होता.उपचारादरम्यान त्याची तब्बेत चांगली झाल्याने मंगळवार दि.११ सप्टेंबरला त्याला डॉक्टरांनी सुट्टी दिली. सदर आरोपी हा गुन्ह्यातील निष्पन्न असल्यामुळे पो.उपनि.चंदु पाटील यांनी त्याला ११ सप्टेंबला रात्री हत्येच्या गुन्ह्यात अटक केली व आज बुधवार दि.१२ सप्टेंबरला आरोपीस पोलीस कोठडीच्या मागणी करीता न्यायालयात हजर केले असता आरोपीस १४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी देण्यात आली.

          या घटनेचा तपास मुर्तिजापुर उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे,माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि.चंदु पाटील व सहकारी पो.काँ.सचिन दुबे करीत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post