यवतमाळःसेल्फी भोवली; दोघांचा नदीत बुडून मृत्यू


यवतमाळ :- पैनगंगा नदीत बोटीत असताना सेल्फी काढताना तोल गेल्याने पाच जण नदीत बुडाले. दोन अल्पवयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

आज मोहरम निमित्त तेलंगणातील आदिलाबादमधील पाच तरुण झरी तालुक्यातील राजूरमध्ये आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास हे सर्वजण पैनगंगा नदीत आंघोळीसाठी उतरले. आंघोळ झाल्यानंतर हे सर्व जण बोटीत बसले. बोटीत बसल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा तोल गेला आणि बोट उलटली. बोट उलटल्याने हे पाचही जण नदील बुडाले. या तरुणांना स्थानिकांनी बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, यात दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हे पाचही जण मूळचे तेलंगणातील आदिलाबादचे रहिवासी असून ते व त्यांचं कुटुंब दरवर्षी मोहरम सणानिमित्त राजूरला येतात, अशी माहिती राजूरमधील रहिवाशांनी दिली.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post