यवतमाळ :- छत्तीसगढ प्रवर्तक पुज्य गुरुदेव रतनमुनिजी म. सा., उपप्रवर्तक सतिश मुनीजी म. सा. आदी ठाणा 5 यांच्या सानिध्यात कळंब येथील जैन धर्म स्थानकात सौ. शिल्पा विरेंद्रजी कोठारी यांच्या 31 उपवासाचे प्रत्याख्यान दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे तसेच परमपुज्य जयमलजी म. सा. यांच्या 311 व्या जन्म जयंती महोत्सवाचे आयोजन सुद्धा या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होत आहे.
विशेष म्हणजे मागील 30 दिवसापासून शिल्पा विरेंद्र कोठारी हिने दिवसा गरम पाण्याचे सेवन करुन मासक्षमन तप आराधना पूर्ण केली असून सर्व सामान्य परिवारातील कलमाबाई पिरचंद कोटेचा यांची सुपूत्री हिने ही तप आराधना पूर्ण केली असून सकल जैन समाजात तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
23 सप्टेंबर रोजी होणार्या प्रत्याख्यानाच्या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सकल जैन बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन खेमचंद कोठारी, बंसीलाल कोठारी, नरेंद्र कोठारी, विरेंद्र कोठारी यांनी केले आहे.