सेवाभावी वृत्तीने काम केल्यामुळेच पतसंस्थेच्या सर्वांगीण विकास — आ.ज्ञानराज चौगुले



  • लोहारा तालुका शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- या शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेने सभासदांना चार लाख रुपयांचे कर्जवाटप करुन सेवाभावी वृत्तीने काम केल्यानेच संस्थेचा सर्वांगीण विकास होत आहे,असे प्रतिपादन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन सतिश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दि.20 सप्टेंबर रोजी लोहारा तालुक्यातील भातागळी येथे घेण्यात आली.या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटन करुन आ.ज्ञानराज चौगुले बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते किरण  गायकवाड, समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायनकर, पंचायत समिती उपसभापती नमिता पाटील, लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा पौर्णिमा जगदिश लांडगे,भातागळीच्या सरपंच दैवशाला भंडारे,माजी सरपंच पिंटू पाटील,प्रदीप मदने आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करताना चेअरमन सतिष जगताप यांनी या पतसंस्थेचे चार कोटी भागभांडवल आहे.या वर्षी 10.5% दराने लाभांश सभासदांना वाटप करणार असल्याचे तसेच व्याजाचा दर 11% वरून 10% केल्याचे त्यांनी सांगीतले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या वतीने 7 जणांना आदर्श शिक्षक व सेवक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन व अहवाल वाचन सचिव सुर्यकांत पांढरे यांनी केले.तर आभार व्हाईस चेअरमन डी.एम. पांचाळ यांनी मानले.या कार्यक्रमास संचालक चंदनशिवे दाजी,कदम चंद्रकांत,राम मुसांडे,गायकवाड जीवन,विकास घोडके,सी.जी.माळी,बळी आलमले,

दत्ताञय फावडे,मल्लिकार्जून कलशेट्टी,शिवाजी चव्हान,श्रीम.माने वर्षा,अकोसकर वंदना व कर्मचारी बाळु कोकणे,सुदर्शन जावळे,के.बी.कारभारी,बालाजी आलमले,परमेश्वर शिंगाडे,डी.आर.साळुंके,मेघराज  कदम,बाळासाहेब कदम,व्यंकट पोतदार,राहुल ओवांडकर,दिपक पोतदार,शिवाजी पोतदार,सुधिर घोडके,प्रविन शिंदे,एस.एम.शेख,झेड.डी.शेख, चंदनशिवे आबा,भरगंडे सर,संजय माशाळकर, शंकर काळे,सतिष माळी,प्रविन कदम,यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post