इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस पदी लोहारा तालुक्यातील वडगाव (गांजा ) येथील हाणमंत प्रभाकर दणाणे यांची निवड करण्यात आली आहे.
हाणमंत दणाणे हे गेली 10 वर्षापासुन उस्मानाबाद राष्ट्वादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्षपद भुषविले आहे. यांच्या कार्याची दखल घेत आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाकडे दणाणे यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवडीबाबत शिफारस केली होती.
याची दखल घेत दि.21 सप्टेंबर रोजी पुणे येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयदेव गायकवाड,प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार,उमरगा, लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर साठे,सुनील माने,विलास रसाळ, नगरसेवक आयुब अब्दुल शेख,अदिंनी अभिनंदन केले आहे.