इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुका राष्टृवादी कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी शहरातील मुक्तार चाऊस यांची दुस-यांदा फेर निवड करण्यात आली.
अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष इलियास पिरजादे यांनी चाऊस यांची दुस-यादा निवड करुन अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवदी बद्दल अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष इलिया पिरजादे,राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस मसुदभाई शेख, शेख,माजी नगराअध्यक्ष खलिफा खुरेशी,उमरगा,लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किशोर साठे,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,अदिंनी अभिनंदन केले आहे.