- अध्यामिक गुरू प्रेमासाईनी केली चर्चा
यवतमाळ : दारव्हा वनपरीक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या पाळोदी जंगल शिवारातील पाझर तलावाच्या बाधकामाकरिता पाळोदी ग्रामवासीयांनी अध्यामीक गुरू प्रेमासाई महाराज यांचे उपस्थित उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांची भेट घेवुन निवेदन दिले .पाळोदी वनपरीक्षेत्रात 20 वर्ष जुने पाझर तलाव असुन या पाझर तलावाचे संपुर्ण बांध तुटलेले आहे.
त्यामुळे या पाझर तलावातील पाणी वाहुण जावुन परीणामी उन्हाळ्यात हा तलाव कोरडा पडतो यासाठी अनेकदा नागरींकानी वनविभागाला पाझर तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी केली पंरतु वनविभागाने पाझर तलावाच्या बाधंकामासाठी पुरेसा निधी उपलब्द नसल्याचे सांगुन टाळाटाळ केली पाळोदी गावात दरवर्षीच पाण्याचा दुष्काळ पडतो त्यामुळे पाझर तलावाला पाणी साठवुन राहील्यास गावातील विहीरीनाही पाणी उपलब्ध् असते .
एकट्या पाळोदी गावात 74 खाजगी विहीर असुन यामध्ये शासकीय पाणी पुरवठा करणार्या 9 विहीरी आहे तरीही गावात बारमाही पाण्याचा दुष्काळ पडलेला असतो अशा परस्थितीत गावकर्यानी या समस्सेवर उपाय योजना करण्यासाठी अध्यामिक गुरू प्रेमासाई यांची भेट घेवुन चर्चा केली असता अध्यामिक गुरू प्रेमासाई महाराज यांनी तोडगा काढीत श्रमदानातुन तसेच स्वताच्या खर्चातुन जेसीबी मशीन लावुन बाधं टाकण्याचा निर्णय घेतला त्यावरून आज उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांच्याशी सविस्तर चर्चा करीत श्रमदानातुन वनविभागाच्या पाझर तलावाच्या खोदकामाची रितसर परवानगी मागीतली आज झालेल्या बैठकीत अध्यामिक गुरू प्रेमासाईंना लवकरच परवानगी प्राप्त करून देत कामाला सुरवात करू असे आश्वासन दिले आहे.
यावेळी पाळोदी गावाचे उपसंरपंच संभाजी विठ्ठल खडसे ,प्रमोद शंकरराव राऊत ,महादेवराव रामचंद्र जांभुळे, किशोर माधवराव येवले ,प्रदिप पांडे ,राजु पांडे ,रमेश ठाकरे ,सुनील राऊत या सह शेकडो गावकरी उपस्थीत होते .