नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन एका 65 वर्षीय शेतकऱ्यानी गळफास घेवुन आत्महत्या


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कर्जाला कंटाळुन सततची नापिकी व दुष्काळ परिस्थितीला कंटाळुन लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील शेतकरी नारायण देवराव साळुंके (वय 65) यानी दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजायच्या सुमारास आपल्या स्वता:च्या घरातील भिंतीच्या खुंटीला दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.

याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.सालेगाव येथील नारायण देवराव साळुंके यांना 1 एकर स्वत:ची शेतजमीन आहे.या शेतकऱ्यानी यंदा खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी 50 हजार रुपये हातऊसणे घेतले होते.

व तसेच सहकारी सोसायटीचे 10 हजार रुपये कर्ज घेतले होते.पावसाने उघडीप दिल्याने पिके करपुन गेल्यामुळे हे घेतलेले 50 हजार रुपये व सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांनी स्वत:च्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली.याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post