यवतमाळ :- यवतमाळ येथील बचत भवन येथे विदर्भ चेंबर ऑफ इंड्रस्टीजच्या वतीने मुंबई हायकोर्टचे न्यायमुर्ती कमलकिशोर तातडे यांचे सत्कार व 10 व 12 वी पास विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील पुस्तकांचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी परिवहन मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रमुख जिल्हा न्यायाधिश पेटकर, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, विदर्भ चेंबर ऑफ इंड्रस्टीज विदर्भाचे अध्यक्ष महेंद्र दर्डा, सकल जैन समाजाचे अॅड. अमरचंदजी दर्डा, अॅड. रविशेखर बदनोरे, अॅड. अमरचंदजी दर्डा, अॅड. रविशेखर बदनोरे, श्वेतांबर मुर्तिपूजक श्री संघाचे अध्यक्ष प्रसन्न दफ्तरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, चामलवार साहेब आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी जवळपास 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले व उर्वरित 1000 मुलांना यवतमाळ जिल्ह्यातील 350 सार्वजनिक वाचनालयाला त्यांचे कार्यक्रमात नेवून देण्यात येईल. पूर्ण जिल्ह्यामध्ये याचे वितरण होईल.
या प्रसंगी न्यायमुर्ति कमलकिशोर तातेड यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना गुणवंत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर व्हावी. या भावनेतून वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासासाठी पुस्तकांचे वितरण करुन ज्ञानात भर व्हावा हा हेतु विदर्भ चेंबर ऑफ इंड्रस्टीज ने बाळगुन हा उपक्रम यवतमाळात राबविला. त्याबद्दल मुक्त कंठाने प्रशंसा करुन महेंद्र दर्डा यांनी हा उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवावा असे आवाहनही त्यांया प्रसंगी आपल्या अध्यक्ष पर भाषणातून अॅड. शिवाजीराव मोघे यांनी आज शिक्षण क्षेत्रात मुलींनी उच्चांक गाठला असून स्पर्धा परिक्षेत सुद्धा यवतमाळ जिल्हा व महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष अतिथी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी विद्यार्थ्यांसाठी महेंद्र दर्डा यांनी चालविलेल्या उपक्रमाबद्दल मुक्तकंठाने प्रशंसा करुन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य निर्माण करण्यासाठी मोठे स्वप्न बघून जीवनात यश संपादन करावे असे आवाहन केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणातून विदर्भ चेंबर ऑफ इंड्रस्टीजचे अध्यक्ष महेंद्र दर्डा यांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात संस्था करीत असलेल्या कार्याबद्दल माहिती देऊन सन्माननीय अतिथी न्यायमुर्ती कमलकिशोरजी तातेड हे यवतमाळ चे भुषण असल्याचे सांगितले.
या प्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील न्यायाधिशांचे व विदर्भ चेंबर ऑफ इंड्रस्टीजच्या पदाधिकार्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. संजय कोचर यांनी तर आभार प्रदर्शन आनंद दर्डा यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विदर्भ चेंबर ऑफ इंड्रस्टीज व महावीर ट्रस्टला या स्पर्धात्मक परिक्षेच्या पुस्तीका उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मागील 45 वर्षापासून या दोन्ही संस्था यवतमाळ जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे.