जितेश कारीया
हिवरखेड :- येथिल बालाजी मंदिर माहेश्वरी भवन येथे तंटामुक्ति अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माहेश्वरी समाज आणि राजस्थानी समाजाचे अध्यक्ष रामगोपालजी टावरी यांनी तंटामुक्ति अध्यक्ष यांना मोतीमाळ हार देऊन स्वागत केले यांच्या नंतर हिवरखेडचे प्रतिष्ठित नागरिक श्री फुकराजजी राठी यांनी शालश्रीफळ देऊन तर श्री जेठमलजी टावरी यांनी श्रीरामजी यांची प्रतिमा देऊन आणि विशेष म्हणजे या सत्कार समारंभ मधे हिवरखेड येथील दुर्ग येथून आलेले श्री घनश्यामजी फोपलिया यांनी श्री रामदेवजी यांचे फोटो असलेला बिल्ला देऊन सत्कार केले
यावेळी तंटामुक्ति अध्यक्ष यांनी केलेल्या कार्याचे सर्व समाज बांधवांच्या वतीने कौतुक करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन श्यामसुंदरजी शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री किरणजी सेदाणी यांनी केले
यावेळी समस्त राजस्थानी समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.