मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि संशोधन व विकास अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याला पाच वर्षे देखभाल व दुरूस्तीसह रस्त्यांसाठी १५१ कोटी



  • ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली प्रशासकीय मंजूरी
  • आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली माहिती
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतनिधी :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि संशोधन व विकास अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण २४५.०३ कि. मी. लांबीच्या ३९ रस्त्यांसाठी १४१ कोटी ६० हजार रुपयांच्या कामांना आणि पाच वर्षे देखभाल व दुरूस्तीसाठी १० कोटी २० लाख ७८ हजार असे एकूण १५१ कोटी २१ लाख ३८ हजार रकमेस ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण २०४.२९ कि. मी. लांबीच्या २६ रस्त्यांसाठी ११६ कोटी ६३ लाख १५ हजार रुपये आणि संशोधन व विकास अंतर्गत एकूण ४०.७४ कि. मी. लांबीच्या १३ रस्त्यांसाठी २४ कोटी ३७ लाख ४५ हजार असे एकूण १४१ कोटी ६० हजार रुपयांची रस्त्यांची दर्जान्नती करण्यासाठी तसेच पाच वर्षे देखभाल व दुरूस्तीसाठी १० कोटी २० लाख ७८ हजार रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कळविले असून याबाबतचे आदेश २३ ऑगस्ट २०१८ रोजी काढण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे खालीलप्रमाणे आहेत.
*"मुख्यमंत्री ग्रामसडक योजना"*
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत *परंडा तालुका*- रामा ६८ ते आसू- लोणी- शेख वस्ती- धुर्वे वस्ती ४ कि. मी. २ कोटी ३३ लाख ६० हजार, रामा ६८ ते खासापूरी- आंदोरा- राजूरी- टाकळी- अंतरगाव ३.३० कि. मी. १ कोटी ७९ लाख १२ हजार, रामा २१० मुगाव- देऊळगाव वस्ती ४.१० कि. मी. २ कोटी १५ लाख ९० हजार, प्रजिमा २ डोंजा- बंगाळवाडी ६ कि. मी. ३ कोटी ५५ लाख ४५ हजार, प्रजिमा १ हिंगणगाव (खु)- जगदळवाडी ५.५० कि. मी. ३ कोटी २८ लाख ८४ हजार. *भूम तालुका*- रामा ५७ ते नळी वडगाव- जोतिबाचीवाडी- पखरूड- रामा १७ कि. मी. ७ कोटी ५३ लाख ४७ हजार, रामा ६२ ते आष्टा- कानडी ८.०१ कि. मी. ४ कोटी ३६ लाख ९९ हजार. वाशी तालुका रामा २३३ ते कन्हेरी- हाडोंग्री १३ कि. मी. ८ कोटी ८ लाख ५६ हजार. कळंब तालुका रामा २३६ ते हिंगणगाव- दाबा- सौंदणा(अ) १४ कि. मी. ९ कोटी ४ लाख २६ हजार, रामा २३६ ते हावरगाव- घोडकी १४.५० कि. मी. ७ कोटी ३९ लाख १६ हजार. तुळजापूर तालुका रामा ६५ ते मुर्टा- होर्टी- तालुका सरहद्द ६.१८ कि. मी. ३ कोटी ३६ लाख ८५ हजार, रामा ६५ ते धनगरवाडी- सराटी- केशेगाव- जिल्हा सरहद्द १०.११ कि. मी. ५ कोटी ९७ लाख २९ हजार, रामा ६५- हंगरगा ना- बोरगाव- कुनसावळी- सिंदगाव- बोळेगाव ते राममा, राममा २०६ हंगरगा- जवळा (म)- वडगाव (दे) १३.५९ कि. मी. ८ कोटी ६१ लाख ९ हजार. उस्मानाबाद तालुका सांजा- वाणेवाडी- वाघोली १३.६४ कि. मी. ९ कोटी ९ लाख ६३ हजार, तेर- पानवाडी- अरणी- जागजी- प्रजिमा ३४ जिल्हा सरहद्द ११.४४ कि. मी. ७ कोटी ३५ लाख ९३ हजार, राममा १४५ ते वाखरवाडी- गोपाळवाडी- तालुका सरहद्द ११.१० कि. मी. ६ कोटी ९० लाख ८१ हजार. लोहारा तालुका प्रजिमा ४१ ते काष्टी (खु) १ कि. मी. ४४ लाख ३४ हजार, प्रजिमा ४१ ते कमालपूर ३.२० कि. मी. १ कोटी ९५ लाख ५३ हजार, रामा २११ ते जेवळी तांडा (पु) १.५० कि. मी. ४२ लाख, रामा २११ ते सुपतगाव- तालुका सरहद्द ४.७० कि. मी. २ कोटी ८९ लाख ७९ हजार, रामा २११ ते मोघा (खु) २.६० कि. मी. ९३ लाख ४० हजार, वडगाववाडी ते मालेगाव २.३० कि. मी. १ कोटी ४२ लाख ३० हजार, रामा २११ ते बेंडकाळ ०.८० कि. मी. ३३ लाख ६४ हजार. उमरगा तालुका टी ४ ते गुगळगाव- गुगळगावाडी- उमरगा १२.६० कि. मी. ५ कोटी ७४ लाख ९० हजार, येणेगूर- सुंदरवाडी- तुगाव १४.१० कि. मी. ८ कोटी ३९ लाख २ हजार. या सर्व कामांच्या ५ वर्षे देखभाल व दुरूस्तीसाठी ८ कोटी ४४ लाख ७ हजार रूपयांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

संशोधन व विकास अंतर्गत"
संशोधन व विकास अंतर्गत रस्त्यांच्या कामात प्लास्टीकचा वापर करून कामे केली जाणार असून पंकजाताई मुंडे यांनी विशेष कोट्यातून ही कामे दिलेली आहेत. *परंडा तालुका*- प्रजिमा २ ते बदर वस्ती १.९० कि. मी. १ कोटी १७ लाख ४३ हजार, प्रजिमा २ ते श्रीधरवाडी- मस्के वस्ती २.२० कि. मी. १ कोटी ३६ लाख ८४ हजार, प्रजिमा ४ ते कंडारी- पिस्तमवाडी ३.१० कि. मी. १ कोटी ९२ लाख २८हजार.भूम तालुका राममा ६२ ते देशमुख वस्ती- वडवणा ४.७० कि. मी. २ कोटी ३९ लाख ४४ हजार, रामा २१० ते आनंदवाडी- खामकर वस्ती १.२० कि. मी. ७० लाख २० हजार, राममा ५७ ते नान्नजवाडी १.१० कि. मी. ६१ लाख ५९ हजार. *वाशी तालुका*- इजिमा २६ ते वडजी ३.७५ कि. मी. १ कोटी ९० लाख ९४ हजार. कळंब तालुका- इजिमा ४४ ते नाथवाडी ३ कि. मी. २ कोटी २४ लाख ७८ हजार, राममा २११ ते वाणेवाडी ३ कि. मी. १ कोटी ८४ लाख ६१ हजार, उस्मानाबाद तालुका- रामा २३९ ते कौडगाव ५.०२ कि. मी. ३ कोटी ५ लाख.
तुळजापूर तालुका*- रामा २०८ ते कसई- आरळी (बु)- येवती- उमरगा (च) ५.९७ कि. मी. ४ कोटी १४ लाख ७ हजार. *उमरगा तालुका*- टी ९ ते कदेर तांडा- सेवालालनगर ४.१० कि. मी. २ कोटी २७ लाख ३५ हजार, टी ७ ते मानेगोपाल १.२० ७२ लाख ९२ हजार. या कामांच्या पाच वर्षे देखभाल व दुरूस्तीसाठी १ कोटी ७६ लाख ७१ हजार रुपयांची तरतूद आहे. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post