वेदांत नारे
दहिहांडा :- जो पर्यत आसिफ खान हे आम्हाला सापडत नाहीत तो पर्यत आम्हि नदिपात्रात सर्च आॅपरेशन चालुच ठेवणार आहोत कारण कोणतेही सर्च , रेस्क्यू आॅपरेशन जोपर्यत सक्येस होत नाही तोपर्यत थांबणे आणि थकुनजाने हे आमच्या डायरीतच नाही असा आत्मविश्वास संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांनी व्यक्त केला होता तो आत्मविश्वास आज सार्थ ठरला आहे पथकाची शोध मोहीम आज सुरू असतानाच दहिहांडा जवळील ब्रम्हपुरी नदिपात्रात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबड उडाली .दिपक सदाफळे याच्यां नेतृत्वात विकी सटाटे,धिरज राऊत , महेश साबळे, श्ऋषीकेश तायडे, ॠतिक सदाफळे , गोविंदा ढोके,यासह ड्रोनकॅमेरामॅन प्रशांत गहले दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदिप देशमुख यांच्या समवेत सकाळ पासुन सर्च आॅपरेशन चालु केले.पोलीस अधिकक्ष कलासागर यांनी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून दिला आसिफ खान यांना शोधण्यासाठी पुर्णानदी पात्रात सर्च आॅपरेशन चालु करणात आले. सर्च आॅपरेशन नदीपात्रात दोन्ही बाजूने मोठ्या बारकाईने चालु होते ज्या ज्या ठिकाणी झाडे झुडपे आहेत.तेथे बारकाईने सर्च केले जात होते. अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे