यवतमाळ :- स्व. गेंदाबाई भवरीलालजी ललवाणी यांची जेष्ठ पुत्र वधू व खैरी येथील विमलाबाई दुलीचंदजी कोठारी यांची जेष्ठ सुपूत्री व डॉ. सुरेशचंद ललवाणी यांची धर्मपत्नी सौ. रेखा सुरेशचंदजी ललवाणी यांनी 31 उपवासाची गोर तप आराधना करुन जैन धर्मातील मासखामन तपश्चर्या पूर्ण केली. ही तपश्चर्या छत्तीसगढ प्रवतर्क परमपूज्य गुरुवर्य रतनमुनीजी म. सा. आदिठाणा 5 यांच्या प्रेरणेने केली असून 31 उपवासाचे पचखान कार्यक्रम कळंब येथील जैन धर्म स्थानक येथे दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी सकल जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कळंब येथील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व चातुर्मास समिती कळंबने केले आहे.
विशेष बाब म्हणजे मागील 18 वर्षापासून डॉ. सुरेशचंद ललवाणी तसेच सौ. रेखा ललवाणी हे धार्मिक कार्यात सक्रियेतेने सहभाग घेतात. सौ. रेखा ललवाणी यांनी आपल्या तप आराधना दरम्यान फक्त गरम पाण्याचे सेवन करुन ही तप आराधना पुर्ण केली त्याबद्दल त्यांचे सर्व सकल जैन समाजात अभिनंदन होत आहे.