- महसुल विभाग देणार का लक्ष ...
- संपुर्ण घर पाण्यात...
अतुल नवघरे
लाखपुरी : मुर्तिजापुर तालुक्यातील गाझीपुर येथील गजानन काशीनाथ ठाकरे यांच्या घराचे पावसाच्या पाण्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत चालु असलेल्या पावसामुळे गजानन काशीनाथ ठाकरे यांच्या घराची छप्पर पडली व संपुर्ण घरात पाणी शिरले त्यामुळे गजानन काशीनाथ ठाकरे हे आर्थिक संकटात सापडले आहे , हे कुटुब अतिशय गरिब असुन या कुटुबाला आजपर्यंत कोणतीट शासकीय योजना तसेच घरकुल सुध्दा मिळाले नाही व झालेल्या घरांच्या नुकसाबाबत आता पर्यंत शासकीय यंत्रना सर्वे करण्या करिता फिरकली सुध्दा नाही..त्यांना लहान लहान मुले आहे व पावसामुळे घरात पाणी आल्याने बिमार पडत आहे व शासना कडुन कोनतीच आता पर्यंत त्याना मदत मीळाली नाही .एकी कडे शासन म्हणते गरिबासाठी आम्ही मदत कराला त्यार आहे व हे परिस्थीती पाहली तर मानसाच्या डोळ्यात पाणी येते हि एक शोंकातिका असुन शासनाने याकडे लक्ष देवुन या कुटुबाला मदत तत्काळ मिळावी अशी मागणी ग्रामस्था कडुन होत आहे .
सदर त्या कुटुबाच्या पाण्यामुळे झालेल्या घराच्या नुकसानी बाबत महसुल विभागाने सर्वे करुन आर्थिक मदत व त्या कुटुबाला घरकुल द्यावे.
सचिन दिवनाले ( भारिप सर्कल अध्यक्ष सिरसो )
सदर झालेल्या नुकसानी बाबत पंचनामा करुन व इंजिनियर कडुन बजेट काढुन त्या कुटुंबाला मदत करण्यात येईल.
राहुल तायडे ( तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर )
सदर कुटुबाच्या पावासामुळे झालेल्या घरांच्या नुकसानी बाबत मी तलाठी यांना पाहणी करण्यास पाठविते.
वैभव फरताळे ( नायब तहसिलदार मुर्तिजापुर )