डॉ. वजाहत मिर्झा यांचा मुबई विधान परिषद चा शपथ ग्रहण



  • शेकडो कार्यकर्ते उपस्थित
  • बरेच वर्षां नंतर युवकाला प्राधान्य


यवतमाळ :- पूसद शहराला पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला काँग्रेस पक्षा तर्फे पुसद येथील तरुण चेहेरा म्हणून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. आणि याचाच शपथ सोहळा हि शपथ विधान परिषदेचे सभापती रामराजे नींबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला  हा शपथ ग्रहण सोहळा
मुबई येथे पार पडला.आणि तसेच


पुसद येथील तरुण नेतृत्व म्हणून आमदार वजाहत मिर्झा यांचे कडे  यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. अश्या वेळेस अध्यक्ष पद देण्यात आले ज्या वेळेस काँग्रेस पक्ष यवतमाळ जिल्ह्यात मागे फेकल्या गेला होता. अश्या वेळेस आमदार वजाहत मिर्झा यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेऊन कार्यकर्त्यांत नवचेतन्य निर्माण केले आणि पक्षा साठी मोर्चे बांधणी सुरु करून अनेक आंदोलने, मोर्चे काढले. त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांच्या कामाची पावती दिली.



यावेळी माजी आमदार विजय खडसे, माजी बांधकाम सभापती तातू देशमुख, डॉ . अमोल मालपाणी, महेश खडसे, नवाब जानी, सय्यद इशतीयक, रमेश चव्हाण, स्वप्नील नाईक, सय्यद इरफान, कयाम नवाब समद कुरेशी, बंटी पठाण, इर्शाद,अली  शे. रमजु, पटेल ठाकरे सर, संजय कोपासे,मोरांडे सर  विशेष करून या शपथ ग्रहण सोहळाला आमदार वजाहत मिर्झा यांच्या आई आतिया बेगम, काका के. आय, मिर्झा, पत्नी मोहमदि बेगम, भाऊ सज्जाद, बहीण डॉ. आसमा काजी, उपस्थिय होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post