![]() |
यवतमाळ : दि. 28 जुलै इंदौर येथे इंटरनेशनल मर्रिओट होटलमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्डस, लंडनकडून आम्ही यवतमाळकर टीमचे मुख्य संयोजक अमित मिश्रा यांचा भव्य सत्कार समारंभामध्ये करून त्यांच्या विश्वविक्रमांची नोंद केलेले प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये खा.वीरेंद्र शर्मा, दिवाकर सुकूल, चेयरमैन वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड,संतोष शुक्ला प्रेसीडेंट वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स भारत,डॉ राजिव श्रीवास्तव वाइस प्रेजिडेंट,सुरभि कौल जनरल सेक्रेटरी, जॉन स्टिक लंदन, प्रसिद्ध बॉलीवुड डायरेक्टर पार्थव घोष,बॉलीवुड फ़िल्म एक्ट्रेस मोना रावल, फ़िल्म स्टार अजय कुमार व देश विदेशतील गणमान्य मेंबर्स उपस्थित होते.
यावर्षी यवतममाळ शहरामधे भीषण पाणीटंचाई दरम्यान महाराष्ट्र शासनच्या वतीने स्वछ पिण्याचे पाणीचे नियोजन न केल्यामुळे यवतमाळकरांना दिवस रात्र पाण्यासाठी भटकावे लागले. समस्त नागरिकांना याहोणार्या त्रासा मुळे समस्त यवतमाळकर त्रस्त झाले होते. त्यांची ही वेदना आम्ही यवतमाळकर टिमचे संयोजक अमित मिश्रा व त्यांच्या टीम ने ओळखून आम्ही यवतमाळकर व वर्ल्ड सोशल आर्गेनाइजेशन द्वारा शासनाच्या विरोधात अांतरराष्ट्रीय स्तारवार आंदोलन केले होते, त्यामध्ये आम्ही यवतमाळकर टिमचे अॅड. जयसिंग चौहान, विजय बुंदेला, श्याम बजाज, सुनील तिवारी, अॅड.बिपीन ठाकरे, अॅड.इमरान देशमुख, अॅड. अजय चमेडिया, सैयद सोहराब, अविनाश गणेवार, अफसर शहा, सचिन आगलावे आदीसह असंख्य युवकांचा समावेश होता.
कार्यक्रमामध्ये चैयरमेन दिवाकर सुकूल म्हणाले यवतमाळच्या पिण्याचे पाणी प्रश्न अंतराष्ट्रीय स्तर पर्यंत नेणे व् त्या आंदोलनात जग भरातील लाखो नागरिकाना सामिल करने हे सोपे काम नाही आम्ही सुरवाती पासून या आंदोलन कड़े लक्ष देत होते. या आंदोलनत जगात सोशल मिडिया च्या माध्यमातुन जगभारतील लाखो लोकांनी सहभाग घेतले. हे या टीम च्या कौतुकचि बाब आहे,जल हेच जीवन आहे, जगात सगळ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे,त्यांनी पुढच्या कार्यक्रमात अमित मिश्रा यांना नेशनल एक्सेलेन्स अवॉर्ड आन्ही हॉउस ऑफ कॉमन,लंदन पार्लिमेंटमधे पण अमित मिश्रा यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे असे कळविले.