सप्तम प्रांतीय अधिवेशनात यवतमाळ मारवाडी महिला मिडटाऊन विविध पुरस्काराने सन्मानित


यवतमाळ :- महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचचे सप्तम प्रांतीय अधिवेशनात इचलकरंजी येथे 18 व 19 रोजी पार पडले. यावेळी प्रदेश पातळीवर उत्कृष्ट कार्य करणार्‍या विविध शाखांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये यवतमाळ मारवाडी महिला मिडटाऊन शाखेला 6 पुरस्कार प्राप्त झाले.
या अधिवेशनामध्ये माजी सहकारमंत्री रमेशजी बंग, प्रांतीय अध्यक्ष सुनीलजी खाबीया, नवनिर्वाचित प्रांतीय अध्यक्ष रामकीशोर वर्मा, ओमजी पाटणी, अमित बोरा, विनीत करवा, रवी अग्रवाल, शाखेच्या संस्थापीका सौ. पूनम जाजू आदी मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यवतमाळ शाखेच्या संस्थापीका पूनम जाजू यांना अमुल्य मार्गदर्शन व निरंतर सहकार्याद्दल स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊन यवतमाळ शाखेला अग्रिम शुल्क प्रेशन विशिष्ट शाखा, विशिष्ट सहभागिता, राजस्थानी भाषा पुरस्कार, स्वच्छता अभियान पुरस्कार, विशिष्ट शाखा सचिव आदी पुरस्कार यवतमाळ शाखेला प्राप्त झाली. हे अधिवेशन अतिशय उत्सवी वातावरणात थाटाने संपन्न झाले. या प्रसंगी यवतमाळ महिला मिडटाऊन शाखेच्या अध्यक्ष सौ. दीपा जोशी, सचिव ममता चांडक, सौ. मनिषा बागडी, सौ. संगीता लोहिया, सौ. संगिता वैष्णव, सौ. रेखा गांधी आदिंनी या प्रांतीय अधिवेशनात उपस्थित राहून शाखेला मिळालेले पुरस्कार ग्रहण केले. विशेष बाब म्हणजे सत्यमेव जयते वॉटर फाऊंडेशन प्रकल्पामध्ये मडकोना हे गांव दत्तक घेऊन उज्वल यश संपादन केल्याबद्दल यवतमाळ शाखेची मुक्त कंठाने प्रशंसा करण्यात आली. यवतमाळ शाखेला मिळालेल्या विशिष्ट पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post