प्रेमासाई महाराज लोकसभा लढणार


यवतमाळ :-  यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती होणार काय? हाच प्रश्न सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील भाजपच्या जेष्ठ नेत्या मनेका गांधी व त्यानंतर वरुण गांधी या दोघांनीही यवतमाळातील वाघापूर परिसरातील महाविर नगरात प्रेमसाई महाराजांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांना यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघात भाजपच्या वतीने लढण्याचे ऑफरही दिली. त्यानंतर प्रेमासाई यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपण दिल्लीत जात असून तेथून आल्यावर आपला निर्णय सांगू असे म्हटले होते. आता ते दिल्लीहून परत आले आहेत. अद्याप भाजप किंवा स्वत: प्रेमसाई महाराज यांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी प्रेमसाई महाराज हे भाजपचे उमेदवार राहु शकतात या चर्चेला राजकीय वर्तुळात बळ मिळत आहे. म्हणजेच विद्यमान शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यावेळी पुन्हा शिवसेनेच्या उमेदवार असतील तर भाजप त्यांच्या विरोधात आपला उमेदवार देणार काय? हाच प्रश्न या मतदार संघात सर्वत्र चर्चेत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post