अथर खान
मूर्तीजापुर :- बहीण व भावाचे पवित्र बंधन म्हणजेच रक्षाबंधन.. राख्या बांधून बहीन भावाचे पवित्र नाते जपते हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम लकडगंज जुनी वस्ती परीसरातील दलित वस्तीत साजरा करण्यात आला. मूर्तीजापुर येथील आमदार हरीष मारोती आप्पापिपंळे व माजी आमदार प्रा.तुकाराम भाऊ बिरकड हे मागील तेरा वर्षापासुन सतत न चुकता स्थानिय मतदार संघातील लकडगंज जुनी वस्तीच्या दलीत वस्तीत जावुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात. वर्षभर आमदार हरीष पिंपळे व माजी आमदार तुकाराम भाऊ बिरकड हे आपल्या कामात व्यस्त असतात परंतु रक्षाबंधनाच्या दिवशी हे आपल्या बहीनीच्या भेटीसाठी न चुकता त्याच्या घरी भेट देऊन रक्षाबंधन साजरा करून त्याच्या समस्या जाणून घेतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने जेष्ठ समाजसेवीका श्रीमती वैजंताबाई विश्वनाथ डोंगरदिवे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.पिंपळे, प्रा.तुकाराम बिरकड, समाजसेवक कैलाश महाजण, वकील संघाचे अध्यक्ष अँड पवन पांडे, दादाभाऊ किर्दक,अँड. चद्रजीत देशमुख, श्रीकृष्ण भटटड, किरणरवि सिरसाट, आशीष जामनीक, राजु डोंगरदिवे, अनिल चावला, याची उपस्थितीती होती. कार्यक्रमाचे नियोजन संचालन व आभार गजानन बेलखेडे यांनी केले.