इकबाल मुल्ला
लोहारा :- मुरम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व प्रतिभानिकेतन उच्च माध्यमिक,प्रातिभानिकेतन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी जनजागृती अभियानातंर्गत शहरातून भव्य रॅलीचे दि.27 ऑगस्ट
रोजी आयोजन करण्यात आले.या रॅलीचा शुभारंभ प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार,मुख्याध्यापक काशीनाथ मिरगाळे,डॉ. सतिश शेळके,प्रा.राजकुमार दलाल,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.विलास खडके,डॉ.
जयश्री सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.महाविद्यालयापासून मुख्य रस्त्याने निघालेल्या रॅलीमधील सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनीनी बर्नर, घोषफलकासह हातात धरुन घोषणाबाजी करत मतदार राजा जागा हो!लोकशाहीचा धागा हो!,मतदान सर्वश्रेष्ठ दान,मतदार नोंदणी नागरिकांचे कर्तव्य अशा घोषणा देवून वातावरण बदलत शिवाजी चौक, बसवेश्वर चौक,अण्णाभाऊ साठे चौक,मुख्य बाजारपेठ ते नगर परिषद येथे समारोप करण्यात आला.या समोराप प्रसंगी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांनी मतदार नोंदणी करुन या राष्ट्रीय कार्यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.लोकशाही राष्ट्र अबाधित ठेवावयाचे असेल तर हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे.या अभियानाकडे लोकचळवळ म्हणून पाहण्याची गरज असल्याचे शेवटी ते म्हणाले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी यावेळी पोष्टर व बॅर्नरद्वारे स्वच्छतेचा संदेश,रस्ता सुरक्षा बाबत माहिती नागरिकांना दिली.या वेळी मुलींनी नगर परिषद सभागृहात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला.प्रा.शोभा पटवारी,उल्हास घुरघुरे,क्रीडा शिक्षक सुजित शेळके,डॉ.भिलसिंग जाधव,प्रा.नारायण सोलंकर,डॉ.राजेंद्र गणापूरे,प्रा.सुधीर पंचगल्ले,डॉ. नागोराव बोईनवाड,प्रा.करबसाप्पा ब्याळे,डॉ.नरसिंग कदम,प्रा.विठ्ठल चलपते,प्रा.राजकुमार त्रिकुळे, प्रा.सुजित सुर्यवंशी,प्रा.विष्णू शिंदे,प्रा.शिवाजी प्रा.मुकूंद धुळेकर,प्रा.त्र्यंबक व्हटकरसह मारुती इंगळे,धीरज मुदकण्णा,अफरीन पटेल,साधना इंगळे आदींनी पुढाकार घेऊन रॅलीचे नियोजन केले.
SHARE THIS