इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून शेती सोबत उद्योग-धंदयातुन आर्थिक प्रगती करावी असे प्रतिपादन — डॉ.रमेश दापके-देशमुख यांनी केले.
दुष्काळाला तोंड देत धीराने उभ्या असलेल्या बळीराजास *शेतकरी दिना* चे औचित्य साधून *सह्याद्री फाउंडेशन्स व कोलेगाव ग्रामपंचायत* च्या वतीने डॉ.रमेश दापके देशमुख यांन् सन्मान-पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी फवारणीच्या वेळेस विषबाधा होउ नये म्हणून सर्व शेतकऱ्यांना संस्थेतर्फे *मोफत मास्क* वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष व सह्याद्री चे मार्गदर्शक *डॉ.रमेश दापके-देशमुख,पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र पाटील,डॉबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे सिनेट चे सदस्य नितीन बागल,सरपंच सौ.नवलबाई सदाशिव कुंभार,सामाजिक कार्यकर्ते
यावेळी रामचंद्र पाटील यांनी कोलेगाव येथे हा कार्यक्रम घेतल्या बद्दल संस्थेचे आभार मानले व संकटाला आत्महत्या हा पर्याय नसल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नितीन बागल यांनी संस्थेला शेतकऱ्याबद्दल असलेली आस्था व आपुलकी या बद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार बब्रुवान वाघमोडे यांनी मानले.या कार्यक्रमास नानासाहेब वाघमोडे,आगतराव टेकाळे, दशरथ पांचाळ,सुखदेव बोडके,तुकाराम टेकाळे, भास्कर बोडके,महादेव बोडके,सुधाकर टेकाळे, दिलीप टेकाळे,व्यंकट लोमटे,रमाकांत लोमटे,अमोल वाघमोडे,प्रकाश लोमटे,बालाजी हाजगुडे,राजाभाऊ टेकाळे व औदुंबर वाघमोडे,यांच्यासर संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.