भाजी मंडीत देशीकट्टा पकडला


यवतमाळ(प्रतिनिधी) :  यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या भाजी मंडीत एका इसमाकडून दहा हजार रुपये किंमतीचा देशी कट्टा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
ओमप्रकाश यादव यांना स्थानिक खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या सहकार्यासह विठ्ठलवाडी भाजीमंडी परिसरात पोहचून एका टिनाचे शेडमध्ये लाल रंगाचे शर्ट घालून असलेला अनिकेत प्रदिप वैद्य नामक तरुण आढळून आला. या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचा लोखंडी देशी कट्टा पॅंटमध्ये खोचून असलेल्या स्थितीत आढळून आला. हा दहा हजार रुपये किंमतीचा तसेच सदर तरुणासोबत असलेला हिरवट रंगाचा शर्ट घालून असलेला भुषणा साखरे रा.अशोक नगर याच्या अंगझडतीत त्याच्या बरमोड्याच्या खिशात एक जिवंत कारतुस अंदाजे 500 रुपये किंमतीची आढळून  आली. गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांनाही अटक केली. तसेच या दोघांजवळून सोनी एक्सपेरीया  कंपनीचा गोल्डन कलरचा 5 हजार रुपये किंमतीचा मोबाइल असा एकुण 15 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुद्‌ध शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंग जाधव, यांच्या मार्गदर्शनात मुकुंद कुळकर्णी, उमेश नासरे, ओमप्रकाश यादव, गजानन धात्रक, बंडू डांगे, किरण पडघण, निलेश घुसे, सुरेंद्र वाकोडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post