- पिंपळगाव रुईकर च्या महिलांची पोलिस अधिक्षकांना आर्त हाक
यवतमाळ : कळंब तालुक्यातील पिंपळगांव ( रुईकर ) या गावात दारुचा महापुरु वाहत आहे. येथे अवैध देशी दारू आणि हातभट्टी विक्रेते जोरात दारू विक्री करीत आहे. हे बंद करण्यासाठी आता मात्र महिलांनीच कंबर कसली आहे. त्यामुळे महिलांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे धडक दिली आणि विनंती केली, साहेब आमच्या गावातील दारुचा महापुरु थांबवा !
शेकडो महिलांचे संसार वाचविन्या, तरुण पीढी वाचविन्यासाठी या महिला सरसावल्या आहेत. गावात अवैध दारू विक्रेत्यांची संख्या १० च्या वर आहे. गावातील छोटी- छोटी मूल दारुच्या आहारी जात आहे. शिवाय शेजारील गावात दारू बंद असल्यामुळे बाहेरुन दारू पिण्यासाठी येनाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रोज संध्याकाळी गावाला यात्रेचे स्वरूप आलेले दिसत आहे. याचाच परिणाम गावातील युवकांनवर होवून गावातील व्यासनांचे प्रमाण वाढत आहे. मात्र या सर्व त्रासाला महिलांनाच सामोरे जावे लागते त्यामुळे महिलांनी आता गावातुन ही दारू हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे.
यावेळी गोपनीय शाखेचे प्रमुख अधिकारी मुकुंद कुळकर्णी यांनी महिलांचे निवेदन स्वीकारुन याची दखल तत्काळ घेण्यात येईल असे पिंपळगावच्या महिलांना आश्वासन दिले. यावेळी स्वामिनी संघटनेच्या जिल्हा संघटिका मनीषा काटे, तालुका संयोजक प्रशांत भोयर, तालुका संघटक पवन धोत्रे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सुनीता खडसे सरपंच, खुशाल पाटील उपसरपंच, शशिकला तेतरे, वंदना बारी अंजना कुमरे, अनिता पीसाळकर, द्वारका कोरले, पुष्पा देशमातुरे, तारा चव्हान, दुर्गा वाकले, मयूरी भोयर, रंजना वाकले, वैशाली रुइकर, कल्पना पीसाळकर उपस्थित होते.