इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- धुळे येथील हाजी हाकम मिया हॉल मध्ये उम्मीद एज्युकेशन अँण्ड वेल्पर संस्थेच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील 10 वा व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ घेण्यात आला.गेल्या तिन वर्षापासुन उम्मीद एज्युकेशनल अँड वेल्फेअर संस्था यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील नेत्र तज्ञ डॉ. यमुकर्रम खान होते.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कमर शेख,वसीम शेख,मजहर सैय्यद,बि.अार. शेख,रफिक शेख,मलक मुबिनोद्दीन,रजीया सुल्ताना, शेख शकीला,डॉ.शकील शेख,कलीम शेख,गयसोद्दीन शेख,सैय्यद बशीरोद्दीन,अलताफ मंसूरी,आदि उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,ट्रॉफी,
हात घडी,बॉलपेन,पाण्याची बॉटल,एक फूल देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियाज सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष सलीम शेख,उपाध्यक्ष जहीकोद्दीन,सचिव एड हनिफ शेख,सहसचिव नईम शेख,शेख आजीमोद्दीन,मिर्झा असिफ,शेख मुनाैव्वर,अदिंनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.