माऊली संगीत क्लास वर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी



तेल्हारा :  स्थानिक तेल्हारा शहरातील प्रसिद्ध माऊली संगीत क्लास येथे विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करून गुरूला मानवंदना वाहिली. गुरुपौर्णिमेला कला क्षेत्रात अनन्य महत्व असून यादिवशी वर्षभर गुरूने दिलेल्या ज्ञानाची गुरुदक्षिणा द्यावयाची असते. गुरू द्रोणाचाराने गुरुदक्षिणेमध्ये एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला होता त्यावेळी गुरुदक्षिणा म्हणून कुठलाही विचार न करता एकलव्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरू द्रोणाचाऱ्यांना दिला होता. अशी आख्यायिका आहे त्याचप्रमाणे गुरपोर्निमेनिमित्त तेल्हारा येथील माऊली संगीत कलासचे संचालक विशाल जळमकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संगीताची शिक्षा घेत असतात, यामुळे गुरूला गुरुदक्षिणा म्हणून हा छोटेखानी कार्यक्रम चिमुकल्यांनी घेऊन एकप्रकारे गुरुदक्षिणाची दिली अशे म्हणणे वावगे ठरणार नाही. यावेळी, पूजा  काकड, प्रतीक्षा सोनोने, श्रुतिका हागे, समीक्षा सोनोने, ओम वाकोडे, स्नेहल धर्माळे, पियुष वळतकार, शाम दबडघाव, ओम भोपळे, पराग अग्रवाल, शुभम डांगे, चाणक्य खरोडे, आयुष्य धनभर, क्वानैन कुरेशी, अहेमद कुरेशी, शिवानी कोरडे इत्यादी विद्यार्थी हजर होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post