चौकाचौकात मोकाट गुरांचा ठिय्या.



  •   मूर्तिजापुरात कुत्रे--डुकरे उदंड जाहली.              


मूर्तिजापूर (प्रतिनिधी). शहरात सद्यस्थितीमध्ये खड्ड्यांच्या पाठोपाठ शहरातील चौकाचौकात मोकाट गुरांचा मुक्त वावर सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणीचा आणि त्रासाचा ठरत चाललेला आहे .समस्या गंभीर असली तरी तिच्याकडे लक्ष देण्यास संबंधितांना वेळ नाही .त्यांच्या लेखी ही समस्या लहान आहे की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

शहरातल्या चौकांमध्येआणि मुख्य मार्गाने मोकाट गुरांचा ठी्य्या जागोजागी दिसून येतो. रस्त्यावर अशाप्रकारे ठिय्या मांडून गुरे शांतपणे बसून असतातकी वाहन आल्यानंतर देखील ते उठत नाहीत. त्यामुळे वाहन चालकाला दक्ष पणे आपले वाहन चालवावे लागते अन्यथा धोका अटळ आहे.



मोकाट गुरे सकाळी अनेक चौकांमध्ये आणि रस्त्याच्या      मधात बसत असल्याने सकाळी शिकवणी वर्ग आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याकरता शहरातील नगरपालिकेकडे कोणतेही सुविधा नाही. पालिकेचा जो कोंडवाडा होता त्याची देखील विल्हेवाट लावण्यात आली आहे .

कोंडवाडा फक्त नावापुरता असून नगरपरिषद या गंभीर समस्येकडे कशाप्रकारे लक्ष घालते आणि हाताळते याकडे नगरवासीयांचे लक्ष लागलेले आहे . त्याचप्रमाणे शहरांमध्ये कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून ही कुत्री भर दिवसा गुरांचे मागे धावतात .त्यांंनी  बकर्‍या व डुक्करांची बळी देखील घेत असल्याचे दिसून येत आहे. शहरात सायंकाळी चौकाचौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा होतात. ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याला त्याची भीती वाटते.



 या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांमध्ये काही कुत्रे वाहनांच्या मागे किंवा सायकलींच्या मागे धावतात. ज्यामुळे एखादी अप्रिय घटना घडू शकते. विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसू शकतो. अनेक वेळा विद्यार्थी हे त्यांच्या सायकलींवरून खाली पडल्याचे घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळेस या कुत्र्यांनी अनेक ठिकाणी मोठ्या संख्येत ठिय्या मारल्यानंतर तिकडून जाणाऱ्यांना आपला रस्ता बदलून जावे लागते. एवढी दहशत या कुत्र्यांनी निर्माण केली आहे. परंतु याकडे लक्ष देण्यास संबंधित विभागांना कुठलाही वेळ नाही.

 त्यासोबतच शहरात कुत्र्यांसोबत डुकरांचा ही वावर चांगलाच वाढला असून घोडे देखील मोकाट असल्याचे चित्र दिसून येते.मुर्तीजापुर शहरातील चौकांमधील वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस अद्यापही गायब आहेत. ते कुठे गेले  ? याचा कोणालाही पत्ता नाही. म्हणून सर्वांना आपापल्या जीवाची आणि सुरक्षेची काळजी घेण्याची वेळ शहरवासी, विद्यार्थ्यी व  ज्येष्ठ नागरिकांवर आलेली दिसून येत आहे. मोकाट कुत्र्यांनी अनेकांची लचके तोडलेली असून कुत्र्याने चावा घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post