![]() |
- महिला शक्ती निरंतर प्रगतीच्या वाटेवर--आमदार हरीश पिंपळे
मुर्तिजापूर(प्रतिनिधी) सद्यस्थितीत मुली तसेच महिला वर्ग सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून याला खेळ देखील अपवाद नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी देखील प्रगतीच्या वाटा शोधल्या असून महिला शक्ती निरंतर प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे मार्गक्रमण करत आहे खेळामध्ये मुलींचा प्रवास लक्षणीय असून देशासाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी केले .
ते भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन व अकोला जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 64 व्या जुनियर राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य पद स्पर्धा उद्घाटन समारोहाचे उद्घाटक म्हणून बोलत होते .व्यासपीठावर भारतीय ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष मनोहराव पाठक हे अध्यक्षस्थानी होते.
![]() |
तर डॉ.वु्दांंताई प्रमोद अवघाते, राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बोडके, सहसचिव डॉक्टर सुरेश बोंगाडे ,मुंबई बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष हनुमंतराव ,सचिव हरीश सतपति ,प्राचार्य विकास सावरकर , मनोहर बिजवे, डीएस गोसावी,प्रा.पी.पी. पाटील, प्राध्यापक गायकवाड, प्राध्यापक दीपक सोळंके, डॉक्टर हरीश काळे, शत्रुघ्न मानकर, सोबत दत्ता, राजू जळमकर ,राजाभाऊ राठोड, राजाभाऊ भंडारकर, राजाभाऊ खंगार, विजय पळसकर , नंदिनी बोंगाडे, अंजुम पठाण ,अनुप मेंढे ,विनायकराव नवघरे, अरुण बोर्डे याची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक नाजुकराव पखाले यांनी केले .तर डॉक्टर सुरेश भोंगाळे, मनोहरराव पाठक यांनी विचार व्यक्त केले
.या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास १९ वर्षातील मुलींचे २० संघ सहभागी झाले आहेत. यातून राष्ट्रीय स्पर्धेकरता खेळाडूंची निवड होणार आहे . स्पर्धा दिनांक 27 ते 29 जुलै दरम्यान घेण्यात येत आहेत .कार्यक्रमाचे प्रास्तविक सतीश वानखडे यांनी केले. आभार प्राध्यापक प्रतापसिंग पाटील यांनी व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरता अकोला जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन मूर्तिजापूर येथील खेळाडू व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.