मराठा रास्ता रोको आंदोलन दरम्यान कळंबोली (मुंबई) येथे पोलीसांकडुन झालेल्या गोळीबारात जख्मी झालेल्या युवकाला शासनाने आर्थीक मदत द्यावी — महिला राजसत्ता आंदोलन विजया वाघ


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कळंब तालुक्यातील सातेफळ येथील रहिवाशी दत्तात्रय अंगद वाघमारे हा युवक कळंबोली(मुंबई) येथील मराठा मोर्चा आंदोलन दरम्यान पोलीस  गोळीबारात जख्मी झाला.या प्रकरणाची चौकशी करुन शासनाने या युनकास आर्थीक मदत द्यावी,अशी मागणी महिला राजसत्ता आंदोलन यांच्यावतीने दि.27 जुलै रोजी उमरगा तहसीलदार व पो.नि.उमरगा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,दत्तात्रय वाघमारे हा पुणे — मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ट्रक ड्रायव्हर म्हणुन नौकरी करतो.दि.25 जुलै रोजी सकाळी ट्रक घेवुन मुंबईला जाताना कळंबोलीत (मुंबई) मराठा समाचाचे रास्ता रोको आंदोलन सुरु होते.आंदोलन कर्त्यांनी त्याचाही ट्रक अडविला.यावेळी दगडफेक करणाऱ्या आंदोलन कर्त्यांना हुसकावुन लावण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केला.यावेळी दत्तात्रय वाघमारे ट्रकपासुन पळत असताना पोलीसांनी त्यांच्यावर गोळीबार केला.त्यांच्यावर महात्मा गांधी मिशन रुग्णालयात उपचार सुरु आहे.तरी या प्रकरणाची चौकशी करुन या युवकास शासनाने आर्थीक मदत द्यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर महिला राजसत्ता आंदोलनाच्या विजया वाघ,सारीका लोंढे,अल्का गुरव,यांच्यासह महिलांच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post