IMAच्या डॉक्टर संपाचा 'ओपीडी'ला फटका



मुंबई :- केंद्र सरकारचे प्रस्तावित राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक अमान्य करीत देशभरातील डॉक्टरांनी शनिवारी एक दिवसाचा संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या संपामुळे सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे देशात साडेतीन लाख तर, महाराष्ट्रात ५० हजारांहून अधिक डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवल्या.

पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या तसेच संसर्गजन्य आजारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना ओपीडीच्या सुविधा मिळाल्या नाहीत. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला तसेच तापाच्या त्रासाच्या तक्रारी वाढल्याने डॉक्टरांकडे गर्दी होती. आज, रविवारी अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने शनिवारी नेहमीच डॉक्टरांकडे गर्दी होत असते. मात्र ओपीडीसुविधा नसल्याने रुग्णांना परत जावे लागले. या संपाला उपनगरामध्ये रेडिओलॉजीसह काही ठिकाणी पॅथॉलॉजी संघटनांनीही पाठिंबा दिल्यामुळे रुग्णांना या सुविधांपासूनही वंचित राहावे लागले. त्याचा सर्वाधिक परिणाम खासगी रुग्णसेवेवर झाला.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post