विनोद सगणे
सिरसोलीः- अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी UPSC (Civil Services) Examination-2019 स्पर्धा परिक्षेच्या (पूर्व व मुख्य परिक्षा) पूर्वतयारी प्रशिक्षणाकरीता दिल्ली येथील नामवंत कोचिंग इन्स्टीटयूटमध्ये अनिवासी व नि:शूल्क प्रशिक्षण
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील 200 उमेदवारांना बार्टीमार्फत प्रशिक्षणासाठी पुरस्कृत (Sponsor) करण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड करण्याकरीता COMMON ENTRANCE TEST (BARTI-DELHI-CET-2019) आयोजित करण्यात येत आहे.
तरी त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत:- दि. 19 जून 2018 स. 10.पर्यंत आहे. सोबत सदर परिक्षेबाबत आवश्यक माहिती दर्शविणारी व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिदध करण्यात आलेली जाहिरात अधिक माहितीसाठी जोडली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी सदर संधीचा लाभ घ्यावा.भाग्यश्री पाईकराव
जिल्हा प्रकल्प अधिकारी समतादुत प्रकल्प, बार्टी, अकोला