नळदुर्ग येथील जामा मस्जिद येथे शहर कॉग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्नतिनिधी :- तुळजीपुर तालुक्यातील नळदुर्ग येथील  जामा मस्जिद येथे नळदुर्ग शहर कॉंग्रेसच्या वतीने  इफ्तार पार्टी देण्यात आली.सर्वप्रथम जामा मस्जिद चे पेश इमाम हाफेज स नियामतुल्ला इनामदार यांचा सत्कार तुळजापूर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.


या इफ्तार पार्टी मध्ये आमदार मधुकरराव चव्हाण,माजी जि.प.अध्यक्ष धिरज पाटील,नळदुर्ग न.प.चे कॉंग्रेसचे  गटनेते तथा नगरसेवक नयरपाशा जागीरदार,माजी नगराध्यक्ष शब्बीर अली सावकार,नगरसेवक शहबाज काजी,मुस्ताक कुरेशी,बसवराज धरणे,जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण,अशोक पाटील,इमाम शेख,जावेद काझी,नगरसेवक विनायक


अंहकारी,शिवाजीराव मोरे,सुर्यकांत पाटील,जिलानी कुरेशी,अझहर जागीरदार,कॉंग्रेस शहरध्यक्ष नवाज काझी,शिवसेनेचे सरदार सिंग ठाकुर,यांच्यासह राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या वेळी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी हिंदु-मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post