केंद्र सरकारच्या 4 वर्षपुर्ती निमित्त विशेष संपर्क अभियान अंतर्गत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुर येथे केंद्र सरकारच्या कामाची माहीती दिली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या 4 वर्षपूर्ती निमित्त विशेष संपर्क अभियानाअंतर्गत सहकार मंत्री सुभाष देशमुख व महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी सोलापूरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व जाणकार व्यक्तींच्या निवासस्थानी भेट घेऊन केंद्र सरकारच्या कामाची माहिती देऊन विविध विषयावर चर्चा केली.
या विशेष संपर्क अभियानाच्या निमित्ताने सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या भेटीचे नियोजन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी,जिल्हाध्यक्ष शहाजी पवार ,अविनाश माहागवकर आदी उपस्थित होते.यावेळी सिद्धेश्वर देवस्थानचे धर्मराज कडादी, विधीतज्ञ मिलींद थोबडे,डॉ.शिरीष वळसंगकर,हॉटेल व्यवसायचे उल्हास सोनी,शिवकुमार मोगले,उमेश डोईजोडे,दत्ता मुळे यांच्याशी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका व त्याउपयोगी साहित्य किट दिले. विविध क्षेत्रातील जाणकारांच्या भेटी दरम्यान त्यांच्याकडून सूचना घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post