भाऊसाहेबांना आज तेल्हारा येथे सर्वपक्षीयांकडून भावपूर्ण श्रद्धांजलीचे आयोजन


तेल्हारा दि . शेतकरी नेते  बहुजनांचे कैवारी राज्याचे कृषिमंत्री आदरणीय भाऊसाहेब फुंडकर यांना तेल्हारा तालुक्यातील व शहरातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम      आज दि 3 जूनला  रविवारला रात्री 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतड्याजवळ आयोजित करण्यात आला आहे

       अकोला जिल्ह्याला कर्मभूमी मानणाऱ्या राज्याचे लोकनेते आदरणीय भाऊसाहेब फुंडकर  यांनी अकोला लोकसभा मतदार संघाचे 3 वेळा प्रतिनिधीत्व केले होते  विरोधी पक्ष नेते  कृषिमंत्री इत्यादी पदावर काम करून जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली न्याय देण्याचे काम केले  भाऊसाहेबांचे विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे व निकटचे संबंध होते त्यांच्या निधनाने  राजकीय सामाजिक  शैक्षणिक व सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे  सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ कार्यकर्ते व  नेत्यांची फळी निर्माण करणाऱ्या  आदरणीय भाऊसाहेब फुंडकरांच्या अकाली निधनामुळे समाजाची फार मोठी हानी झाली आहे

 समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अठरापगड जाती सह बाराबलुतेदारांना  खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम भाऊसाहेबांनी केले  अशा महान नेत्याला तालुक्यातील सर्व राजकिय पशाचे नेते कार्यकर्ते  पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या वतीने 3 जूनला रात्री 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतड्याजवळ    भावपुर्ण सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी केली आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post