
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,श्रीपतराव भोसले हायस्कूल अंतर्गत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर (आण्णा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या हातलाई कुस्ती संकुलनाचा शानदार शुभारंभ झाला.
यावेळी व्यासपीठावर हिंंद केसरी पै.दिनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, उपमहाराष्ट्र बाळासाहेब पडघम, डबल महाराष्ट्र केसरी सय्यद चऊस,महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीहाकर, पै. असलम काझी,काकासाहेब पवार,डबल महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख,पै.बबन कांशीद, महाराष्ट्र केसरी छोटरावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी शिवाजी पचपुते, उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार, पै. लहु गाढे, पै उत्तम कदम,पै.वामनभाऊ उबाळे,मारुती माळी, पै. असलम काझी, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेते राहुल आवारे, रावसाहेबआप्पा मगर, पै वामन गाते, पै. नागनाथराव देशमुख, पै. शिवाजी धुमाळ, राजाभाऊ देवकते,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर आण्णा पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आदी मान्यवर उपस्थित होते.
हातलाई कुस्ती संकुलच्या शुभारंभ प्रसगी राज्यतून आलेल्या मान्यवर हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी कुस्ती सम्रटांची भव्य मिरवणुक शिवाजी चौक, आंबेडकर चौक ते कुस्ती सकुल पर्यत काढण्यात आली.युवा नेते अभिराम (भैय्या) पाटील यांच्या संकलपनेून हातलाई संकुल उभारण्यात आले आहे.
सुधीर (आण्णा) पाटील यांनी पंचवीस महाराष्ट्राच्या धरतीवर धाराशिव जिल्ह्यात प्रथमच हातलाई कुस्ती संकुलांची स्थापना केली असून सुधीर (आण्णा) पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील तरुणाना एक सुवर्ण सधी उपलब्ध करुन दिली आहे. सध्या युवापिढी व्यसनाधीन हात चालेली आहे. व्यसनापासून मुक्त आशा जगात तरुण युवकांनी शरीरयष्टी कमवली पाहिजे. शरीरयष्टी हिच खरी संपत्ती आहे.तरुण युवकांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या अंतर्गत हातलाई कुस्ती संकुल उभे करुन एक चांगली सर्वण संधी दिली आहे.
