- अर्धेशहर अंधारात : १३ तासानंतर विज पुरवठा सुरळीत..
पूर्णा/प्रतिनिधी : शहरातील अर्ध्या भागाचा विद्यूत पुरवठा गुरूवारी रात्री पडलेल्या पहिल्याच पावसात खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.तब्बल १३ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने विद््यूत मंडळाचे फ्यूज उडाल्याचे दिसून आले आहे.
शहरातील आनंद नगर, आदर्शकालनी, अलंकार नगर, तात्यासाहेब नगर,अमृत नगर, शास्त्रीनगर बसस्थानक परिसरात या भागात ९ते १० वाजण्याच्या सुमारास रिमझीम पावसास सुरूवात झाली.काही काळ विजेचा लपंडाव सुरू होता.परंतू अचानक १०: ३० वाजण्याच्या सुमारास संपूर्ण परिसरातील विज गुल झाली. पावसाच्या आगमनावर विज गुल झाल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.वयवृद्ध नागरिक,लहान बालकांना सर्वाधीक गर्मीचा त्रास सहन करावा लागला.रात्र अंधारात काढावी लागली.तब्बल १३ तासानंतर या भागातील नागरिकांनी विद्य्यूत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता अब्दुल. जब्बार यांना धारेवर धरले असता शुक्रवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास विजपुरवठा सुरळीत झाला.
SHARE THIS
